श्री सदगुरुचरित्र अध्याय - १ ( श्लोक ) मराठी माहिती
. श्री गणेशाय नमः ।
श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः ।
श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।
जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥
हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसले ।
त्याचेनि वाते विघ्न पाले । विघ्नक मी तुज ॥२॥
तुझे शोभे आनन. जसे तप्त कांचन.
किंवा उदित प्रभार । तैसे तेज फाकतसे ॥३॥
विघ्नकान कलमनासी । फरश धरिलासी ।
नागबंद कटीसी । उर्ग यज्ञोपवीत ॥४॥
चतुर्भुज दिससी निका । विशाला विनायका ।
प्रतिपालिसी विश्वलोका । निर्विघ्न करूनिया ॥५॥
तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती ।
सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥
सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी ।
चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लोंबोदरा ॥७॥
वेद शास्त्रे पुराणे । तुझेच असेल.
ब्रह्मादिकी या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥
त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे अर्चिले तुम्हासी ।
संहारावया दैत्यांसी । आधी तुम्हांसी स्तविले ॥९॥
हरिहर ब्रह्मादिक ज्ञान । कार्यांभी तुज वंदिती ।
सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥
कृपानिधी गणनाथा । सुरवरादिका विघ्नहर्ता ।
नायक विका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥
समस्त गणांचा नायक । तूचि विघ्नांचा अंतक ।
तू वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥
सकळ कार्या आधारू । तूचि कृपेचा सागरू ।
करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥
माझ्या मनीची वासना । तुवा पुरवावी गजानना ।
साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आतां ॥१४॥
नेणता होतो मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
चौदा विद्यांचे निधान । शरणगतवरप्रदा ॥१५॥
माझिया अंतःकरणी व्हावे । गुरुचरित्र कथन करावे.
पूर्णदृष्टीने पहा. ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥
आता वंदू ब्रह्मकुमारी । जिचे नाम वागीेश्वरी ।
पुस्तक वीना जिचे करी. हंसवाहिनी असे देखा ॥१७॥
म्हणोनि नमतो तुझे चरणी । प्रसन्न व्हावे मज स्वामिणी ।
राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आतां ॥१८॥
विद्या वेद शास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेशी ।
तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥
एक माझी विनंती. द्यावी आता अवलीला मती ।
विस्तार कराव्या गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥
जय जय जगन्माते । तूचि विश्वी वाग्देवते ।
वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशीपरी ॥२१॥
माते तुझिया वाग्बाणी । उत्पत्ति वेदशास्त्रपुराणी ।
वदता साही दर्शनी । त्यांते समूह परियेसा ॥२२॥
गुरूचे नामी तुझी स्थित । तो नृसिंहसरस्वती ।
याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणून ॥२३॥
खांबसूत्रींची बाहुली जैसी । खेळती तया सूत्रसरसी ।
स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि सांगत ॥२४॥
तैसे तुझेनि अनुमते । माझे जिव्हे प्रेमे ।
कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥
म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे स्वामिणी प्रसन्न ।
पहा माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आतां ॥२६॥
आता वंदू त्रिमूर्तीसी । ब्रह्मविष्णुशिवांसी ।
विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥
चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता जो का सृष्टीसी ।
वेदे बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन ॥२८॥
आता वंदू हृषीकेशी । जो नायक त्या विश्वासी ।
लक्ष्मी अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥
चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा करी ।
पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥
पीतांबर असे कसियेला वैजयंती माळा गळा ।
शरणागता अभीष्ट सकळा । देता होयकृष्णू ॥३१॥
आता नमू शिवासी । धरिली गंगा मस्तकेसी ।
पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥
पंचवदन असती ज्यासी । संहारी जो या सृष्टीसी ।
म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन ॥३३॥
व्याघ्रांबर पांघरून । सर्वांगी असे सर्पवेष्टण ।
ते शंभु उमरण । त्याचे चरणी नमन ॥३४॥
नमन समस्त सुरवरा । सिद्धसाध्यां अवधारा ।
गंधर्वयक्षीनरा । ऋषीश्वरा नमन ॥३५॥
वंदू आता कविकुळासी । पराशादि व्यासांसी ।
वाल्मीकादि सकळिकांसी । नमन परियेसा ॥३६॥
नेणे कवित्व असे कसे. म्हणोनि तुम्हा विनवितसे ।
ज्ञान जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥
न कळे ग्रंथ प्रकार । नेणे शास्त्रांचा विचार.
भाषा करावी महाराष्ट्र. म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥
समस्त तुम्ही कृपा करणे. माझिया वचन साह्य होणे.
शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥
जसे सकळिका विनवोनि । मग धाइले पूर्वज मनी ।
उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥
आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥
त्यापासून नागनाथ । देवराव तयाचा सुत.
सदा श्रीसद्गुरुचरण धता ॥ गंगाधर माझा ॥४२॥
नमन साठी जनचरणी । माता पूर्वज ध्यातो मणी ।
जो का पूर्वज नामधारी । आश्वलायनाचा ॥४३॥
काश्यपाचे गोत्री । चौंडेश्वरी नामधारी ।
वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥
त्याची कन्या माझी जननी । निश्चये जैशी भवानी ।
चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥
नमिता जनकजननीसी । नंतर नमू श्रीगुरुसी ।
घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥
गंगाधराचे कुशी । जन्मी परियेसी ।
सदाध्याय श्रीगुरुसी । एका भावे सलग ॥४७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । करी संतांसी नमस्कार ।
श्रोतया विनवी बस । क्षमा करणे बाळासी ॥४८॥
वेदाभ्यासी संन्यासी । यती योगेश्वर तापसी ।
सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥
विनितसे समस्तांसी । अल्पमती आपणासी ।
माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥
तावन् मात्र माझी मति । नेणे काव्ययुत्पत्ति ।
जसे श्रीगुरु निरोपिती । तेणे परी सांगतो ॥५१॥
पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी।
निरोप देते माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥
म्हणे ग्रंथ कथन करी । अमृतघटने स्वीकारली.
तुझे वंशी परपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥
गुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही अनुमानु ।
सिद्धि पावविणार आपण । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
त्रैमूर्तीचा अवतार । ही नरसिंहसरस्वती नर।
कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा वर्णावे ॥५५॥
असे चरित्र श्रीगुरुचे. वर्णू न शके मी वाचे ।
आज्ञा असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥
ज्यास पुत्रपौत्री असे चाड । त्यासी कथा असे गोड ।
लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥
ऐशी कथा जयाचे हाल । वाचिती नित्य प्रेमभरी ।
श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥
रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि ।
निःसंदेह साता दिनी । एकता बंधन तुटे जाणा ॥५९॥
किती पुण्यपावन । सांगेन ऐक विस्तारता ।
सायासाविण होयता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥
निधान लाधे अप्रयासी । तरी कष्ट का सायासी ।
विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥
आम्हा साक्षी असे घडले. म्हणोनि विनवितसे बोले ।
श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥
तृप्ति झालियावरी ढेकर । झगझगीत .
गुरुमहिमेचा उद्गार. बोलतसे अनुभवोनि ॥६३॥
मी सामान्य म्हणोनि. उदास व्हाल माझी वचनी ।
मक्षिकेच्या मुखांतुनी । मधुकेवी ग्रह्य होय ॥६४॥
जसे शिंपल्यांत मुक्ताफळ. किंवा कर्पूर कर्दळ.
विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥
ग्रंथ कराल उदास । वाकुड कृष्ण दिसे ऊस ।
अमृतवत निघाले त्याचा रस । दृष्टी द्यावी तयावरी ॥६६॥
तैसे माझे बोलणे. ज्याची चाड गुरुस्मरण ।
अंगिकार करणार शहाणे. अनुभविती एकचित्ते ॥६७॥
ब्रह्मरसाची गोडी । अनुभविता फळें रोकडी ।
या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय महाज्ञानु ।
श्रोती करोनिया सावध मनु । एकचित्ते परियेसा ॥६९॥
श्रीगुरुनृसिंहसरस्वती । होते गाणगापुरी ख्याति ।
महिमा त्यांचा अत्यद्भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥
तया ग्रामी वसती गुरु । म्हणोनि महिमा असे थोरु ।
जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥
तेथे रहोनि आराधिती । द्रुत होय फलप्राप्ति ।
पुत्र दारा धन । जे इच्छिले होय जना ॥७२॥
लाधोनिया संताने । नामे ठेविती नामकरण ।
संतोषरूपे । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥
जसे वर्तमान । भक्त एक 'नामकरणी' ।
कष्टसे अति गहनी । सदाध्याय श्रीगुरुसी ॥७४॥
तो मनी व्याकुळित । चिंतने वेष्टिला बहुत ।
गुरुदर्शना जाऊ म्हणतो. निर्वाणमानसे निघाला ॥७५॥
अति निर्वाण अंतःकरणी । लय होवोनि गुरुचरणी ।
स्थान शिष्यशिरोमणी. विसोनिया क्षुधातृषा ॥७६॥
निर्धार करोनि मानसी । म्हणे पाहीन श्रीगुरुसी ।
अथवा सांडिन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥
ज्याचे नामस्मरण यासाठी दिन्यहानि होय त्वरित ।
आपण तैसा नामांकित । किंकर म्हणतसे ॥७८॥
दैव असे आपुले उणे । तरी का भजावे श्रीगुरुचरण ।
परिस लावता लोहा जाण । सुवर्णकेवी होतसे ॥७९॥
तैसे तुझे नाम परिसे । माझे ह्रदयी सदा वसे ।
माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥
या बोलाचिया हेवा । मनी धरोनि पहावा ।
गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥
अतिव्याकुळ अंतःकरणी । निंदास्तुति आपुली वाणी ।
कष्टला भक्त नामकरणी । होय परियेसा ॥८२॥
राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे ।
वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥
गुरुची त्रामूर्ति । तो वेदश्रुति ।
सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥
कलियुगात ख्याति । श्रीनृसिहसरस्वती ।
भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥
कृपासिंधु भक्ता । वेद वाखाणिता।
त्रिमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥
त्रिमूर्तीचे गुण । तू एक निधान.
भक्तांसी संरक्षण । दयानिधि ॥८७॥
दयानिधि यती । विनितो मी श्रीपती ।
नेणे भावभक्ती । अंतःकरणी ॥८८॥
अंतःकरणी स्थिरु । बाई बा श्रीगुरु ।
तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥
पाव वेगी आता. नरहरी अनंता ।
बाळालागी माता. केवी टाकी ॥९०॥
तू माता तू पिता तूचि सखा भ्राता ।
तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥
परवंशी धरूनि निर्धारी ।
भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥
सरस्वती नरहरी । दिन्य माझे हरी ।
म्हणून मी सतत. सदा कष्टे व९३ ॥
सदा कष्ट चित्ता. का हो आता देशी.
कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥
कृपासिंधु भक्ता । कृपाळू अनंता ।
त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥
त्रिमूर्ति तू होसी । पाळिसी विश्वासी ।
समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥
समस्ता देवांसी । तूचि दाता होसी ।
मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥
तुजवाचोनी आता । असे कवन दाता.
विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥
सर्वज्ञाची खुण । असे हे लक्षण.
समस्तांचे जाणे. कवण करणें ॥९९॥
सर्वज्ञ म्हणोनि । वानिती पुराणी.
मला अंतःकरणी न ये साक्षी ॥१००॥
कवन कैशापरी । असती अधिकारी ।
जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥
बाळक तान्हे । नेणे बापमाये ।
कृपा केवी होय. मातापित्या ॥२॥
दिलियावांचोनि । न देवे म्हणोनि ।
तुझे मनी असेल. सांग मज ॥३९॥
समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बलिदान ।
ते हो पाताळी । बसविले ॥४॥
सुवर्णाची लंका. तुवा दिल्ही एका ।
तेणे पूर्वी लंका. कवणा दिल्ही ॥५॥
अढळ ध्रुवासी । दिल्हे हृषीकेशी।
त्याला हो तुम्हासी. काय दिल्हे ॥६॥
निःक्षत्र करून । विप्राते मेदिनी ।
देता तुम्हा कोणी. काय दिल्हे ॥७॥
सृष्टी वनस्पती. तूचि देव एक ।
तूते मी मशक. काय तुम्ही ॥८॥
नाही तुम्हा श्रीमंत नरहरी ।
लक्ष्मी तुझे नांदतसे ॥९॥
याहोनी आम्हासी । तू काय मागसी ।
सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥
मातेचे वोसंगी । बैसोनिया बाळ वेगी ।
पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥
बाळापासी माता । काय मागे ताता ।
ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥
घेऊनिया देता । नाम नाही दाता ।
दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥
देऊ न शकसी । म्हणे मी मानसी ।
चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥
तुझे मनी पाही । वसे आणिक काही ।
सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥
सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।
नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥
तळी बावी विहिरी । असती भूमीवरी ।
मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥
मेघाची ही सेवा । न करिता स्वभावा ।
उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥
सेवा अपेक्षिता । बोल असे दाता ।
दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥
नेणे सेवा कैसी । स्थिर होय मानसी ।
माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥
माझे पूर्वजवंशी । सेविले तुम्हांसी ।
संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥
बापाचे सेवेसी । पाळिती पुत्रासी ।
तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥
माझे पूर्वधन । तुम्ही द्यावे ऋण ।
का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥
आमुचे आम्ही घेता । का बा नये चित्ता ।
मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥
आता मज जरी । न देसी नरहरी ।
जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥
दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा ।
दास मी अंकिता । सनातन ॥२६॥
आपुले समान । असेल कवण ।
तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥
कठीण कीजे हरी । तुवा दैत्यांवरी ।
प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥
सेवका बाळकासी । करू नये ऐसी ।
कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥
माझिया अपराधी । धरोनिया बुद्धि ।
अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥
बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी ।
अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥
माता त्या कुमारासी । कोप न धरी कैशी ।
आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥
कवण्या अपराधेसी । न घालिसी आम्हासी ।
अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥
माता हो कोपासी । बोले बाळकासी ।
जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥
माता कोपे जरी । एखादे अवसरी ।
पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥
तू माता तू पिता । कोपसी गुरुनाथा ।
सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥
तूचि स्वामी ऐसा । जगी झाला ठसा ।
दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥
अनाथरक्षक । म्हणती तुज लोक ।
मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥
कृपाळु म्हणोनि । वानिती पुराणी ।
माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥
नायकसी गुरुराणा । माझे करुनावचना ।
काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥
माझे करुणावचन । न ऐकती तुझे कान ।
ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥
करुणा करी ऐसे । वानिती तुज पिसे ।
अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥
ऐसे नामांकित । विनविता त्वरित ।
कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥
वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु ।
तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥
येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी ।
मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥
केश तो मोकळी । झाडी चरणधुळी ।
आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥
ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त ।
पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥
आनंदभरित । झाला नामांकित ।
ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥
भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ।
संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
॥ ओवीसंख्या १४९ ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

No comments:
Post a Comment